शक्यतो महाविकास आघाडी ,नसता स्वबळावर ; आ सतीश चव्हाण

Foto
 महापालिका  निवडणुकीत महाविकास  आघाडी होणार की नाही हे  अजून ही गुलदस्त्यात आहे. शिवसेना, कांग्रेस आणि  राष्ट्रवादी आघाडी करून मैदानात  उतरतील  या  विषयी तीनही पक्षांच्या  पदाधिकाऱ्यांची प्राथमिक  बैठक ही झाली. दरम्यान  राष्ट्रवादी  कांग्रेस पक्षाचे स्थानिक नेते आमदार सतीश  चव्हाण यांनी मित्र पक्षांना  इशारा दिला. राष्ट्रवादी  पक्षाला  कमी  लेखून  चालणार  नाही. कोणाला  वाटत असेल कि शहरात  आमची ताकद नाही तर ते  चुकीचे आहे. आम्ही  सन्मानाने आघाडी करू, एक  नाही दहा वेळेस बसू , समान कार्यक्रम व समान जागा  वाटपाचा फार्मुला समोर  ठेऊनच पुढचे पाऊल टाकू.  वॉर्ड रचने विषयी चव्हाण  यांनी मनपा अधिकाऱ्यांना  धारेवर धरले. दोन तीन  नेत्यांच्या व पदाधिकाऱ्यांचा    हट्ट पुरविण्या साठी  अधिकाऱ्यांनी पूर्ण शहरास  वेठीस  धरल्याचा आरोप  लावला. अनेक तक्रारी येत  आहे. घोळ  करणाऱ्या  अधिकाऱ्यांची चौकशी  करून त्यांच्या वर कडक  काररवाई करण्यात यावी. अशी मागणी ही यावेळी  चव्हाण यांनी केली. शनिवारी  सुनावणी झाल्या नंतर पूर्ण  चित्र समोर येई, तेव्हा पाहू  असं ही चव्हाण यांनी  सांगितले.